dr.satish best web design developer for mac

हणमंतवाडी ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्यातील सामानगडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव म्हणजे हणमंतवाडी. चारी बाजूने हिरवीगर्द झाडी, स्वच्छ हवा, गाईगुरं, बैलगाडया, साध्या स्वभावाची आपुलकीने भरलेली माणसं, एकाच प्रकारच्या रचनेची लहान मोठी घरं, गावातील विहिरी व त्यावरील लयबध्द आवाजात वाजणारा रहाट, ग्राम देवस्थानं, त्यांच्या त्या त्या तिथीच्या जत्रा असं आल्हाददायक वाटणारं असं आमच्या गावाचं स्वरूप आहे. पावसाळयापूर्वी ‘काजवे’ झाडांवर लुकलुकणा-या दिव्यांची आरास मांडतात. चारशे लोकवस्तीच लहान पण टुमदार असं आमच गाव. गावात विहिरी व बोरवेल खणले आहेत त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो. गाव लहान असल्याने पूर्वी खमलेट्टी, तनवडी व हणमंतवाडी या गावांची ग्रुप ग्रामपंचायत होती. मात्र 1981 नंतर आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना करण्यात आली आहे. गावातील बहुतांश लोक शेती करतात पाण्याचे अन्य साधन उपलब्ध नसल्याने शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे जिरायती पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

गाव लहान असल्याने पूर्वी खमलेट्टी, तनवडी व हणमंतवाडी ग्रुप ग्रामपंचायत होती मात्र 10 मे 1981 रोजी स्वातंत्र्य ग्रामपंचायतीची स्थपना करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर चार सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे.

सरपंच
सौ. सुरेखा वसंत गायकवाड

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. राजेश पांडुरंग जाधव

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. परशुराम पांडुरंग रावण

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Hanmantwadi Grampanchayat
A/p - Hanmantwadi Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416551

CONTACTS
Phone :

Office :